माणसाला आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी परस्परांमध्ये देवाणघेवाण
करावी लागते. या देवाणघेवाणीच्या व्यवहारातूनच मोजमापनाचा जन्म झाला. पुढे वस्तूच्या बदल्यात वस्तू देताना त्यातील ढोबळपणा घालवून
प्रमाणाची अचूकता ठरवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्यातून मोजणीसाठी एकक ठरवणं, मोजमापणासाठी खास साधनं आणि पद्धती अवलंबन व वस्तूच्या मापनाप्रमाणे तिची किंमत चलनी रुपात मान्य करणं
अशा गोष्टी टप्प्याटप्याने विकसित होत गेल्या. त्यातही एकवाक्यता यावी म्हणून जागतिक पातळीवर लांबीकरिता मीटर, द्रव्यमानाकरिता किलोग्रॅम, कालावधीकरिता सेकंद, विद्युत् प्रवाहाकरिता अँपिअर, तापमानाकरिता केल्व्हिन व प्रकाशाच्या दीप्ती तीव्रतेकरिता कँडेला अशा मूलभूत राशी निश्चित केल्या गेल्या. त्यातूनच लांबी, रुंदी, उंची, खोली, क्षेत्रफळ, वजन, वेळ यासह अनेक गोष्टींचं अचूक मापन करण्याचं तंत्र जसंजसं विकसित होत गेलं, तसातसा विज्ञान – तंत्रज्ञानासह विविध क्षेत्रांचा विकास सहजसाध्य होत गेला.
अर्थात मोजमापनाच्या तंत्रांत झालेला हा क्रांतीकारी बदल
अचानक घडून आलेला नाही. त्यामागे अनेकांनी आपल्या आयुष्यातला दिलेला मोठा काळ आहे, शेकडो वर्षांची संशोधन प्रक्रिया आहे.
ती कशी घडली आणि त्यातून आजच्या विकसित तंत्रापर्यंत
मनुष्य कसा पोहोचला याचा मनोरंजक वेध घेणारं हे पुस्तक.
ते विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यासह विविध क्षेत्रात काम करणार्या जिज्ञासूंना अत्यंत उपयुक्त ठरेल अशी आशा आहे…
Mojmapanachi Gamtidar Duniya Part-1,2,3,4
मोजमापनाची गमतीदार दुनिया – भाग १,२,३,४
Dilip Herlekar
दिलीप हर्लेकर

Maharashtrian Vishesh – Non-Veg Combo
Jira Papad
गोड शंकरपाळी
Savayiche Gulam
Black Gravy Masala
Kahani Vakpracharachi







Subhash Vaze (verified owner) –
Quite easy to use, nice design, surely will buy again
Subhash Vaze –