Showing 21–40 of 52 results
- Books
Hiranyagarbh By Sakharam Athavale
हिरण्यगर्भ कहाणी ब्रह्मांडनायकाची श्री स्वामी समर्थांची (आध्यात्मिक कादंबरी)अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे एक परब्रह्माचा अद्भुत, असामान्य व अनाकलनीय अवतार होऊन गेले!त्यांच्या ज्ञात लीला अक्कलकोट मधील वास्तव्याच्या म्हणजेच साधारणपणे २२ वर्षांच्या असल्या तरी, त्यांचा भूतलावरील भौतिक तसेच सूक्ष्मात वावर हा साधारण ७३० वर्ष इतका दीर्घ होता !ह्या कादंबरीचे लेखन करताना मी त्यांचे लहान बाळ होऊन, त्यांच्या कडेवर बसून, त्यांच्या ७३० वर्षांच्या प्रवासाचा साक्षी होण्याचा प्रयत्न कथारूपात उलगडला आहे.तुम्हां सर्वांना सुद्धा हा अद्भुत प्रवास अनुभवायचा आहे का? तुम्ही देखील बाळ होऊन स्वामी माऊलीच्या कडेवर बसा व हा आनंद लुटा! मला खात्री आहे की स्वामी माऊलीच्या गूढ व्यक्तिमत्त्वाची अनुभूती तुम्हाला नक्कीच आनंद देईल!श्री सद्गुरवे नमःअक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांचा जयजयकार असो.
SKU: n/a - Books
Kathapournima (कथापौर्णिमा) By Poonam Chhatre
“कथापौर्णिमा” हा विविधांगी मानवी नातेसंबंधांचे अनुबंध उलगडणाऱ्या पंधरा कथांचा संग्रह आहे. ‘होते कुरूपं बेडे या कथेतून सौंदर्याच्या भ्रामक कल्पनांवर मात करणारी विदुला भेटते, वास्तव आपुष्य आणि मनोरंजन विश्व यातील दरी “होम मिनिस्टर’ नंतर या कथेतून सीमाच्या नजरेतून अधोरेखित होते, आयुष्याला बिटलेल्या शारदेची व्यक्तिरेखा “मरणाने केली सुटका’मधून प्रखरपणे उभी राहते, तर आई-मुलीचे हळूवार बंध “नाळ” या कथेतून उलगडतात. ‘तुझ्या नसानसांत मी”, “निस्सीम”, “हृदयी वसंत फुलताना आणि मनाचिये गुंती’ कथांमध्ये प्रेमाच्या अनेकरंगी मनमोहक कंगोऱ्यांचे दर्शन होते. “अभंग “बाणी आणि “स्वीकार” या कथांतून लहान मुलांचे भावविश्व उलगडते, तर “अनुदिनी अनुतापे’ आणि ‘फॅमिलीवाला’ या कथा पुरुषांची संवेदनशील बाजू मांडतात. “वटवृक्ष”, “पराभव” आणि “व्हॉट्सप आई” या कथा ज्येष्ठ नागरिकांच्या अंतरंगात डोकावतात.प्रत्येक माणूस अनेक गुंतागुंतीच्या, तरी हव्याहव्याशा नात्यांमध्ये गुंतलेला असतो. त्याच नात्यांना विविध परिस्थितीच्या कोंदणात बद्ध करून, त्यातून निर्माण झालेल्या बंधांचे दर्शन “कथापौर्णिमा’मध्ये समर्थपणे होते. वा कथा चित्रदर्शी आहेत. प्रत्येक वयोगटाच्या वाचकाला स्वतःचे प्रतिबिंब या कथांमध्ये दिसेल.
SKU: n/a - Books
RAMAYANA, MAHABHARATA BHAGAVATA (3 BOOKS OF BOX SET) by Devdutt Pattanaik
An enthralling retelling of India’s greatest epic, the Mahabharata, Jaya seamlessly weaves into a single narrative plots from the Sanskrit classic as well as its many folk and regional variants. With clarity and simplicity, the tales in this elegant volume reveal the eternal relevance of the Mahabharata and the complex and disturbing meditation on the human condition that has shaped Indian thought for over 3000 years. Sita approaches Ram and the Ramayana by speculating on the titular character: her childhood with her father, Janaka, who hosted sages mentioned in the Upanishads; her stay in the forest with her husband, who had to be a celibate ascetic while she was in the prime of her youth; her interactions with the women of Lanka, recipes she exchanged, the emotions they shared; her role as a goddess, the untamed Kali as well as the demure Gauri, in transforming the stoic prince of Ayodhya into God. The Bhagavata is the story of Krishna, known as Shyam to those who find beauty, wisdom and love in his dark complexion. Shyam tells the story of Krishna’s birth and his death, bringing together the fragments of this great epic composed over thousands of years, first as the Harivamsa, then as the Bhagavata Purana, and finally as the passionate songs of poet-sages in various regional languages.SKU: n/a - Books
Shivsena, Lokadhikar Ani Mi By Gajanan Kirtikar
मुंबई महाराष्ट्रात आहे, पण मुंबईमध्ये महाराष्ट्र नाही – ही विदारक वस्तुस्थिती आहे. ही स्थिती बदलण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली समर्पित भावनेने कार्य करणार्या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाची कामगिरी अतुलनीय अशीच आहे. मुंबईत महाराष्ट्र वाढीस लावणार्या व मराठीकरणाचे तेजस्वी कार्य करणार्या लोकाधिकारच्या कार्याचा जेवढा गौरव करावा तेवढा कमीच आहे. — वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज
SKU: n/a






















