Books
Showing 51–75 of 162 results
- Books
Gudgulyaa by V. S. Khandekar
१९२० ते १९२५ या पाच वर्षांच्या संक्रमणकाळानंतर मराठी ललित वाङ््मयात नवनवीन लेखकांनी आपापली वैशिष्ट्यपूर्ण दालने उघडली. विनोदाच्या क्षेत्रात चिंतामण विनायक जोशी यांनी आपली स्वतंत्र; परंतु खणखणीत नाममुद्रा उमटवली. याआधी मराठीतील विनोदाचे स्वरूप निबंधासारखे होते. चिंतामणरावांनी त्याला गोष्टीचे वळण दिले. त्यांच्या प्रतिभेने आजवर लाखो वाचकांना हसवले आहे. आपल्या दु:खांची शल्ये बोथट करून घेण्याच्या कामी त्यांना साहाय्य केले आहे. एकीकडे गुदगुल्या करीत, दुसरीकडे त्यांना आपल्या लहानमोठ्या विसंगतींची जाणीव करून दिली आहे. व्यक्तिजीवनातल्या आणि समाजजीवनातल्या अनेक नव्याजुन्या विसंवादी गोष्टींवर त्यांनी प्रकाश टाकला आहे. विविधता, सरसता व वास्तवता ही त्यांच्या विनोदशैलीची गुणवैशिष्ट्ये म्हणता येतील. या छोट्याशा पुस्तकात वानवळा म्हणून संग्रहीत केलेल्या त्यांच्या निवडक सहा विनोदी कथांवरून त्यांच्या बाह्यत: अत्यंत साध्या दिसणाया, पण विलक्षण मार्मिक असलेल्या विनोदीदृष्टीचा संचार किती अप्रतिहत आहे, हे वाचकांना सहज कळून येईल.- Rs. 80.00
–0%SKU: n/a - Books
Hiranyagarbh By Sakharam Athavale
हिरण्यगर्भ कहाणी ब्रह्मांडनायकाची श्री स्वामी समर्थांची (आध्यात्मिक कादंबरी)अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे एक परब्रह्माचा अद्भुत, असामान्य व अनाकलनीय अवतार होऊन गेले!त्यांच्या ज्ञात लीला अक्कलकोट मधील वास्तव्याच्या म्हणजेच साधारणपणे २२ वर्षांच्या असल्या तरी, त्यांचा भूतलावरील भौतिक तसेच सूक्ष्मात वावर हा साधारण ७३० वर्ष इतका दीर्घ होता !ह्या कादंबरीचे लेखन करताना मी त्यांचे लहान बाळ होऊन, त्यांच्या कडेवर बसून, त्यांच्या ७३० वर्षांच्या प्रवासाचा साक्षी होण्याचा प्रयत्न कथारूपात उलगडला आहे.तुम्हां सर्वांना सुद्धा हा अद्भुत प्रवास अनुभवायचा आहे का? तुम्ही देखील बाळ होऊन स्वामी माऊलीच्या कडेवर बसा व हा आनंद लुटा! मला खात्री आहे की स्वामी माऊलीच्या गूढ व्यक्तिमत्त्वाची अनुभूती तुम्हाला नक्कीच आनंद देईल!श्री सद्गुरवे नमःअक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांचा जयजयकार असो.
SKU: n/a - Books
Kathapournima (कथापौर्णिमा) By Poonam Chhatre
“कथापौर्णिमा” हा विविधांगी मानवी नातेसंबंधांचे अनुबंध उलगडणाऱ्या पंधरा कथांचा संग्रह आहे. ‘होते कुरूपं बेडे या कथेतून सौंदर्याच्या भ्रामक कल्पनांवर मात करणारी विदुला भेटते, वास्तव आपुष्य आणि मनोरंजन विश्व यातील दरी “होम मिनिस्टर’ नंतर या कथेतून सीमाच्या नजरेतून अधोरेखित होते, आयुष्याला बिटलेल्या शारदेची व्यक्तिरेखा “मरणाने केली सुटका’मधून प्रखरपणे उभी राहते, तर आई-मुलीचे हळूवार बंध “नाळ” या कथेतून उलगडतात. ‘तुझ्या नसानसांत मी”, “निस्सीम”, “हृदयी वसंत फुलताना आणि मनाचिये गुंती’ कथांमध्ये प्रेमाच्या अनेकरंगी मनमोहक कंगोऱ्यांचे दर्शन होते. “अभंग “बाणी आणि “स्वीकार” या कथांतून लहान मुलांचे भावविश्व उलगडते, तर “अनुदिनी अनुतापे’ आणि ‘फॅमिलीवाला’ या कथा पुरुषांची संवेदनशील बाजू मांडतात. “वटवृक्ष”, “पराभव” आणि “व्हॉट्सप आई” या कथा ज्येष्ठ नागरिकांच्या अंतरंगात डोकावतात.प्रत्येक माणूस अनेक गुंतागुंतीच्या, तरी हव्याहव्याशा नात्यांमध्ये गुंतलेला असतो. त्याच नात्यांना विविध परिस्थितीच्या कोंदणात बद्ध करून, त्यातून निर्माण झालेल्या बंधांचे दर्शन “कथापौर्णिमा’मध्ये समर्थपणे होते. वा कथा चित्रदर्शी आहेत. प्रत्येक वयोगटाच्या वाचकाला स्वतःचे प्रतिबिंब या कथांमध्ये दिसेल.
SKU: n/a - Books
Lokmanya Tilak Yanchya Aathvani Aani Akhyayika (लोकमान्य टिळक यांच्या आठवणी आणि आख्यायिका — स. वि. बापट)
-70%
BooksLokmanya Tilak Yanchya Aathvani Aani Akhyayika (लोकमान्य टिळक यांच्या आठवणी आणि आख्यायिका — स. वि. बापट)
लोकमान्य टिळक यांच्या आठवणी आणि आख्यायिका — स. वि. बापट
हे पुस्तक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल, त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील कार्याबद्दल आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी सांगितलेल्या आठवणी, किस्से व अप्रकाशित पैलू यांचा संग्रह आहे. टिळकांच्या मानवी, विचारशील आणि कठोर नेतृत्वगुणांच्या ओळखीचा हा जिवंत दस्तऐवज आहे.
SKU: n/a - Biographies & Autobiographies, Books
Majhi Atmakatha माझी आत्मकथा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
“मी वर्गीकृत लोकांत जन्मलो. त्या लोकांची प्रगती घडवून आणण्यासाठी आपले आयुष्य खर्च करावयाचे, याबद्दलची प्रतिज्ञा मी लहानपणीच केलेली आहे. या प्रतिज्ञेपासून च्युत करणारी अनेक आमिषे मला माझ्या आयुष्यात आली व गेली.फक्त स्वतःचेच चांगले करण्याचे मी लहानपणात ठरविले असते तर मला हव्या त्या प्रतिष्ठित पदावर विराजमान होता आले असते आणि काँग्रेसमध्ये मी शिरलो असतो तर तिच्यातील अत्यंत श्रेष्ठ पदाचा मी उपभोग केला असता. परंतु वर्गीकृत लोकांच्या उन्नतिप्रीत्यर्थ माझे सर्व आयुष्य वाहण्याचे ठरविले आहे आणि हे ध्येय डोळ्यापुढे ठेवून मी एका तत्त्वाचा अवलंब करीत आलो आहे. ते तत्त्व हे की, जे कार्य सफल करण्याचा एखाद्याला भरपूर उत्साह वाटतो व ते कार्य पार पाडणे हेच ज्याच्या मनाला एकसारखे लागून राहिलेले आहे, त्याने ते कार्य पार पाडण्यासाठी आकुंचित विचारसरणीचा व कृतीचा अवलंब केला तर ते श्लाघ्य होईल. वर्गीकृत लोकांच्या हिताहिताचा प्रश्न सरकारने फार दिवस त्रिशंकूप्रमाणे लोंबकळत ठेवलेला आहे. हे पाहन माझ्या मनाला किती वेदना झाल्या असतील याची तुम्हाला (वरील हकिकतीवरून) कल्पना येईल.’
-डॉ. बाबासाहेब आंबेडकरडॉ. भीमराव रामजी तथा बाबासाहेब आंबेडकर (१४ एप्रिल, १८९१ – ६ डिसेंबर, १९५६), हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, बॅरिस्टर, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते.
आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात विद्यावाचस्पती पदव्या मिळविल्या; तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवरील संशोधन केले. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचार व चर्चामध्ये सामील झाले, समाजप्रबोधनात्मक वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. इ.स. २०१२ मध्ये, द ग्रेटेस्ट इंडियन नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची ‘सर्वश्रेष्ठ भारतीय’ म्हणून निवड करण्यात आली आहे.
प्रस्तुत ग्रंथ विद्यार्थी, ज्ञानसाधक, अभ्यासक आदींना प्रेरक ठरेल, असा विश्वास वाटतो.SKU: n/a

आंबोळी पीठ
























