Biographies & Autobiographies, BooksElon Musk : Business Principles from the World’s Most Powerful Entrepreneur इलॉन मस्क Paperback – 1 November 2020 Marathi Edition by Randy Kirk (Author), Suniti Kane (Translator)
Review
‘‘…तो म्हणजे एक मुलुखावेगळी, अफलातून वल्लीच आहे! त्याच्यापुढे काही अत्यंत भव्यदिव्य स्वप्नं आहेत : ‘मानवाला अनेक ग्रहांवर वास करणारी प्रजाती बनवणं’ आणि ‘मानवजातीची जीवाश्मइंधनावरची आधीनता दूर करणं,’ या स्वप्नांच्या पूर्तीसाठी तो अफाट शक्ती, वेळ आणि पैसा खर्च करतोय. एलॉन अत्यंत बुद्धिमान आहे. त्याच्या ठायी अफाट शक्ती आहे आणि विकासाबाबतची त्याची ओढ जाज्वल्य आहे. तो खरोखरच एक अवलिया आहे; कारण तो जगरहाटीबाहेरील विचारसरणी आणि कृती आचरत असतो. त्याच्या साहसाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्याला सामील झालेल्या आमच्यासारख्यांना आणि त्याला स्वत:ला एका विवक्षित क्षणी जाणवलं की, मूलगामी परिवर्तन त्या व्यवस्थेच्या आत राहून करता येत नसतं; परंतु त्या व्यवस्थेच्या बाहेरूनच ते करता येणं शक्य असतं. आमच्यापैकी काहीजण तर चक्क असंही समजतात की, मोठी अर्थव्यवस्था आणि समाज प्रत्यक्षात प्रगतीच्या आडच येत असतो आणि सुधारणा घडवण्यासाठी, तुम्ही त्याबाहेर पडूनच प्रयत्न करणं आवश्यक असतं.
एलॉन, त्याच्या आयुष्यातील रहस्यं आणि समस्यांवर तोडगे शोधण्याचं त्याचं तंत्र यांवर खूप लेखन झालेलं आहे. ‘द एलॉन मस्क मेथड’ हे पुस्तक वेगळेपणानं उठून दिसतं; कारण त्यात एलॉनवर प्रारंभीच्या काळात प्रभाव पाडणाऱ्या अनेकांचा परामर्श घेण्यात आला आहे. बँक व्यवसाय, त्यानंतर अंतराळ प्रकल्प, त्यापुढील कार प्रकल्प आणि त्यानंतर त्या अनुषंगानं येणारे ऊर्जा आणि परिवहन यांच्या पायाभूत सुविधांचे प्रकल्प या प्रवासातील त्याचे प्रारंभीचे प्रेरणास्रोत या पुस्तकात आढळतात. एलॉनला कोणत्या गोष्टीमुळे ही संप्रेरणा मिळाली याचा रँडीला अचूक बोध झालेला असल्यामुळे, आजच्या जगातला सर्वांत प्रभावशाली माणूस कसा घडत गेला याचं आपल्याला त्याच्याकडून अचूक दर्शन घडतं.’’
– जिम कॅन्ट्रेल
₹199.00 ₹250.00
Compare
Aaruni Khanolkar (verified owner) –
It’s far better than those similar products, while the price is still acceptable.
Aaruni Khanolkar –