Books
Showing 151–162 of 162 results
- Books, Sciences, Technology & Medicine
द पॉवर ऑफ हॅबिट ( मराठी ) Paperback – 1 January 2000
द पॉवर ऑफ हॅबिट आपण जे करतो ते का करतो? ते कसे बदलायचे न्युयॉर्क टाईम्सचे अर्थविषयक पारितोषिकप्राप्त पत्रकार चार्ल्स डुहीग, हे त्यांच्या द पॉवर ऑफ हॅबिट या पुस्तकातून आपल्याला सवयींसंबधीच्या आश्चर्यकारक आणि चित्तथरारक वैज्ञानिक जगताची सफर घडवून आणतात. काही व्यक्तींना आणि कंपन्यांना स्वतःला बदलण्यासाठी अनेक वर्षे का प्रयत्न करावे लागतात, का झगडावे लागते, तर त्याच वेळी काही मात्र, स्वतःमध्ये एका रात्रीत बदल घडवून आणतात हे कसे याचा ते शोध या पुस्तकामध्ये घेतात. आपल्या सवयी कसे कार्य करतात आणि त्यांचा आपल्या मेंदूमध्ये नेमका कोठे उगम होतो याचा शोध घेण्यासाठी, मेंदू वैज्ञनिकांचे चाललेले प्रयत्न जाणून घेण्यासाठी ते विविध प्रयोगशाळांना भेटी देतात आणि ऑलिंम्पिक जलतरणपटू मायकेल फेल्फ, स्टार बक्सचे मुख्याधिकारी हॉवर्ड शुल्झ आणि नागरी हक्क चळवळीचे प्रणेते मार्टिन ल्युथर किंग (ज्यु.) यांच्या यशामध्ये सवयीचा वाटा किती महत्त्वाचा होता याचा ते रहस्यभेद करतात. त्या सर्वांचा परिपाक म्हणजे हे लक्षवेधी कथन आणि सशक्त शोध ः व्यायामामध्ये नियमित पण आणण्यासाठी, वजन घटवण्यासाठी हुशार मुलांचे योग्य संगोपन करण्यासाठी, कार्यक्षमतेमध्ये वृद्धी करण्यासाठी, अद्वितीय आस्थापनांची उभारणी इत्यादी करण्यासाठी, सवयी काय व कशा उपयोगी पडू शकतात. याचे मर्म जाणून घेणे महत्त्वाचे आहे. या नव्याने विकसित झालेल्या शास्त्राचा उपयोग करून आपण आपल्या व्यवसायात, आपल्या समाजात आणि आपल्या जीवनात संपूर्ण परिवर्तन घडवून आणू शकतो. लालित्यपूर्ण सुबोधता असलेले, प्रभावी विचार प्रवर्तक, चौकस आणि उपयुक्त. – जिम कॉलिन्स बौद्धिक गांभिर्य आणि आपल्या वाईट सवयी सोडण्याचे मार्ग, याबद्दलचा व्यवहार्य सल्ला याचा संतुलित मेळ राखणारे, पहिल्या दर्जाचे पुस्तक. – द इकॉनॉमिस्ट अक्षरशः संमोहित करणारे. – द इकॉनॉमिस्ट
SKU: n/a - Biographies, Diaries & True Accounts, Books
बहिर्जी
Bahirji Naik, was honoured by Chatrapati Shivaji Maharaj with the
title “Naik” for his great works in Intelligence. He was a 17th century
Indian spy and military commander in the army of Shivaji at a time when
the Maratha Empire and Mughal Empire were at war.SKU: n/a - Books
राम आर्यावर्ताचे पुनरुत्थान Ram Aryavartache Punarutthan By Rajendra Kher
वाल्मिकी रामायणात वर्णन केलेले अनेक प्रसंग आज कल्पित वाटू शकतात , परंतु रामायण हे कल्पित काव्य नसून तो आपल्या भारताचा सहस्रो वर्षाचा दैदिप्यमान इतिहास आहे . रामजन्म, ऋषींचं कार्य, इंद्राचे स्वरूप आणि कार्य ,जटायूचं वास्तविक स्वरूप ,वानरे,पुष्पक विमान ,रावणाचे साम्राज्य ,दक्षिण अमेरिकेपासून भारताच्या पूर्वेकडच्या देशांपर्यंत घडलेलं राजकारण ,आदी गोष्टी ,घटना आजच्या शोधांशी ताडून पहिल्या तर आपण पाषाण किंवा ताम्रयुगातला इतिहास वाचत नसून अत्यंत प्रगत संस्कृतीविषयक इतिहास वाचत आहोत याचा अनुभव देणारे पुस्तक
SKU: n/a - Books
वॉरन बफे (Marathi) Warren Buffet शेअर बाजारावर हुकमत गाजवणाऱ्या यशस्वी बिलियनेअरची कथा
शेअर बाजार म्हटलं की, समोर येणारं नाव म्हणजे वॉरन बफे. वॉरन बफे
यांचं आयुष्य म्हणजे पैसे कसे मिळवावेत, कसे टिकवावेत आणि कसे वाढवावेत
याचा आदर्श वस्तुपाठच आहे. त्यांचा हा जीवनप्रवास अत्यंत वेगवान आणि
रोमांचक असा आहे. * चौदाव्या वर्षी आयकर भरणारा वॉरन ! * पस्तिसाव्या
वर्षीच करोडपती होण्याचं ध्येय साध्य करणारा अवलिया * आजही पहिल्या पाच
श्रीमंतांमध्ये स्थान असणारा * वॉरन बफेचे सिद्धांत आणि गुंतवणुकीचे
तंत्रज्ञान * शेअर्सचं नेमकं मूल्यमापन कसं करावं ? * शेअर बाजारात मंदी
असतानाही नफा कमवण्याचे शास्त्रSKU: n/a - Books
स्वरस्वामिनी आशा Swarswamini Asha
माझी आशाची पहिली ओळख झाली तेव्हा तिची छबी ही साधे पाचवारी पातळ ,पोलके कपाळावर कुंकवाचा मोठा टिळा , गच्च केसांच्या दोन वेण्या आणि हातात खूपशा सोन्याच्या बांगड्या घालणारी स्त्री अशी होती . जी मनमोकळ्या ,लाघवी व थट्टेखोर स्वभावाची होती .जिवलगा .राहिले रे दूर घर माझे हे मी लिहिलेले गाणे आशाने गायले आहे ,त्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी तिने काठावर फाटलेली पांढरी रेशमी साडी घातली होती .त्या फाटलेल्या साडीला मी सुई दोऱ्याने चार टाके घातले होते. फाटकी साडी केवळ लकी आहे म्हणून नेसणारी आशा ही अशी मनस्वी आहे . आशाचे तिच्या सर्व भावंडांवर प्रेम आहे व त्याचीच प्रचिती लता दीदींवर तिने लिहिलेल्या आमचे छोटे दादा यामध्ये आली आहे . पण जिभेने ती जरा तिखट आहे . आशाला वाचनाची देखील विलक्षण आवड आहे ,थोडक्यात काय तर मंगेशकरांच्या कलासंपन्नते बरोबरच या घराचे साधे निर्मळपणही आशाच्या रक्तात पुरेपूर भिनलेले आहे . स्वकष्टाने ,जिद्दीने ,धैर्याने आणि कलेच्या अखंड साधनेनें आशाने चित्रपटसृष्टीमध्ये आजचे हे मानाचे स्थान मिळविले आहे . शांता शेळके
SKU: n/a

बहिर्जी
सूर्य गिळणारी मी









